येस न्युज मराठी नेटवर्क : पूर्व विभागातील एका मध्यमवर्गीय कुटुंबातील आरती सोमा या कन्येने एमपीएससी परीक्षेत पहिल्याच प्रयत्नात यश संपादन करून आदर्श निर्माण केला. आरतीचे शिक्षण पद्मशाली शिक्षण संस्था संचलित बुर्ला प्राथमिक शाळेत प्राथमिक तर पुल्ली कन्या प्रशालेत माध्यमिक शिक्षण पूर्ण झाले. सिव्हिल इंजिनिअरिंगची पदवी प्राप्त केल्यानंतर तिने महाराष्ट्र इंजिनिअरिंग सर्व्हिसेसची परीक्षा पहिल्याच प्रयत्नात उत्तीर्ण झाली. लेखी परीक्षेनंतर मुलाखत घेण्यात आली. सध्या वॉटर रिसोर्सेस डिपार्टमेंट मध्ये असिस्टंट इंजिनिअर या पदावर तिची निवड झाली. तिच्या या यशाबद्दल तिचे कुटुंबीय व गुरुजन यांनी तिचे कौतुक केले.
पुल्ली कन्या प्रशालेत आयोजित करण्यात आलेली वार्षिक सर्वसाधारण पालक सभा अतिशय उत्साही वातावरणात संपन्न झाले . इ 5 वी ते 9 वी चे जवळपास 700 पालक यावेळी उपस्थित होते. परीक्षा , मूल्यमापन , निकाल आणि शाळा पूर्व तयारी या विषयावर मुख्याध्यापिका गीता सादुल यांनी पालकांना मार्गदर्शन केले. यावेळी एमपीएससी परीक्षेत यश संपादन केलेल्या आरती सोमा हिचा सत्कार करण्यात आला. यावेळी उपमुख्याध्यापक युवराज मेटे , पर्यवेक्षिका प्रणिता सामल , व सर्व शिक्षक उपस्थित होते.