सोलापूर : अंजनी इवेंट्स प्रस्तुत लोकमंगल फाउंडेशन आणि दि आर्ट ऑफ लिव्हिंग यांच्या संयुक्त विद्यमाने महिलांसाठी मकर संक्रांतनिमित्त हळदी कुंकू आणि उखाणे स्पर्धा घेण्यात आली. याला उस्फुर्त प्रतिसाद मिळाला.
हा कार्यक्रम विजापूर रोडवरील अंजनी मल्टीपर्पज हॉल येथे पार पडला. यावेळी लोकमंगल फाउंडेशनच्या संचालिका अवंतीताई देशमुख, आर्ट ऑफ लिव्हिंगच्या अंजु क्षीरसागर,नगरसेविका संगिता जाधव, अश्विनी चव्हाण, राजश्री बिराजदार , मनिषा हूच्चे, जान्हवी माखीजा , शुभांगी भोसले यांच्यासह अनेक महिला उपस्थित होत्या. यावेळी महिलांसाठी विविध खेळ घेऊन हळदी कुंकूचा कार्यक्रम घेण्यात आला. यावेळी वाण म्हणून निसर्ग मित्र मनोज देवकर आणि जान्हवी माखीजा यांच्याकडून तुळशीचे रोप देण्यात आले. याप्रसंगी उमंगच्या माध्यमातून महिलांनी पतंग उडवून अनोखा उपक्रम सादर केला . लहान मुलांसाठी बोरन्हान कार्यक्रम घेण्यात आला. प्रत्येक महिलांचे पदपूजन करून त्यांना हळदी कुंकू व तिळगुळ देण्यात आला. कार्यक्रमामध्ये उखाणे स्पर्धा, संक्रातीच्या थीमवर रॅपवॉक करून महिलांनी विविध गुणदर्शन सादर करून विविध बक्षिसे मिळविली. प्रथम पारितोषिकासाठी पैठणी बक्षीस देण्यात आली. कार्यक्रम यशस्वी करण्याकरिता , सरस्वती हिबारे, ऐश्वर्या हिबारे, दीपाली नंदुरकर यांचे सहकार्य लाभले. या कार्यक्रमाला axon रिऍलिटी, Badabusiness.com, साईश्वरी ब्युटी पार्लर, शीतल आर्ट ज्वेलरी, सिद्ध डिजिटल यांचे प्रयोजन लाभले.