ग्रामविकासामध्ये सरपंचांचे योगदान महत्वाचेः आ. सुभाष देशमुख

0
515
  •  सोलापूर सोशल फाऊंडेशन आयोजित सरपंच प्रशिक्षण कार्यशाळा

सोलापूर (प्रतिनिधी) : हिवरे बजारचे सरपंच पोपट पवार यांच्यामुळे गावाला राज्यात प्रसिद्धी मिळाली आहे. त्यांचा आदर्श सर्वांनी घ्यावा. सरपंचांनी गाव स्तरावरील समस्या प्रशासन समोर मांडावी, जि. प. शाळेचा दर्जा सुधारण्यासाठी लोकसहभाग घ्यावा, गावातील आरोग्य सेवेवर काम करावे, गावात व्याख्याने, मेळावे, प्रबोधनात्मक कार्यक्रम घ्यावेत, गावातील उत्पादनाचे मार्केटिंग करावे, शेतीपूरक व्यवसाय करावा प्रक्रिया उद्योग करावे, वृक्ष लागवडीचे प्रमाण वाढवावे तर गावसमृद्ध होईल. कारण ग्रामविकासामध्ये सरपंचाचे योगदान महत्वाचे असते, असे प्रतिपादन आ. सुभाष देशमुख यांनी केले.

सोलापूर सोशल फाऊंडेशनतर्फे वडाळा येथील लोकमंगल महाविद्यालयात आयोजित सरपंच प्रशिक्षण कार्यशाळेत अध्यक्षस्थानावरून आ. देशमुख बोलत होते.  यावेळी  राज्यस्तरीय प्रशिक्षक शिवाजीराव पवार, ग्रामविकास तज्ज्ञ मार्गदर्शक  विकास जाधव, पाणी फौंडेशनचे मधुकर डोईफोडे  आदी उपस्थित होते.  विकास जाधव यांनी कृषी विभागाच्या, वैयक्तिक लाभाच्या योजना, सिंचन, पिण्याचे पाणी, शेती करिता पाणी, स्मशानभूमी, जि.प. शाळांचा स्तर, ग्रंथालये, क्रीडांगणे यासारखे उपक्रम तसेच ग्रा.प. अधिनियम पालन करीत गावामध्ये व्यवस्था लावणे याबाबत सरपंचांना माहिती दिली.

पाणी फाउंडेशनचे मधुकर डोईफोडे यांनी लोकसहभागातून वृक्ष लागवड बाबतचे नियोजन,  शेतकर्‍यांना माती परीक्षणाचे, गांडूळ खत, ग्राम स्वच्छता, ओढा खोलीकरण- सरलिकरण, युवकांना एकत्रित करून जास्तीत जास्त कार्यक्रमाचे आयोजन करावे, असे सांगितले.  यावेळी सोलापूर सोशल फाऊंडेशन संचालिका  पूर्वा वाघमारे,  सल्लागार शिवाजीराव पवार, मुख्य समन्वयक विजय पाटील, समन्वयक विपुल लावंड, विजय कुचेकर व जिल्ह्यातील  सरपंच उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here