सोलापूर जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीच्या निमित्ताने विविध पक्षातील नेत्यांनी आपल्या घरातच उमेदवारी घेतल्या आहेत. यामुळे काही ठिकाणी नाराज झालेल्या कार्यकर्त्यांनी थेट पक्षाला रामराम ढोकला. अक्कलकोटचे आमदार सचिन कल्याणशेट्टी यांच्या पत्नी शांभवी यांना भाजपने चपळगाव गटातून उमेदवारी दिली आहे आहेत. तर याच चपळगाव गणातून आमदारांची भाऊ सागर कल्याण शेट्टी यांना उमेदवारी दिली आहे. माजी मंत्री आणि शिंदे सेनेचे नेते सिद्धाराम म्हेत्रे यांनी मुलगा शिवराज याच्यासाठी सलगर गटातून उमेदवारी घेतली आहे तर कन्या शितल यांच्यासाठी तोळनूर झेडपी गटातून गटातून अर्ज भरला आहे. माळशिरसचे आमदार उत्तम जानकर यांनी कन्या ज्योती हिला दहिगाव गटातून आणि मुलगा जीवन याला दहिगाव गणातून राष्ट्रवादी शरद पवार गटाची उमेदवारी दिली आहे तर याच मतदारसंघात भाजपचे माजी आमदार राम सातपुते यांनी आपली पत्नी संस्कृती हिला उमेदवारी मिळवली आहे. त्यामुळे आजी आणि माजी आमदारांच्या कुटुंबीयांमध्ये ही रंग लढणार आहे. सोलापुरातील काँग्रेसचे माजी आमदार दिलीप माने यांनी कोंडी गटातून भाजपकडून पृथ्वीराज माने या आपल्या मुलाला उमेदवारी घेतली आहे. माजी आमदार दीपक साळुंखे यांनी आपले चिरंजीव यशराज याला शेकाप आणि साळुंखे यांच्यातील आघाडीतून जवळा गटातून उमेदवारी घेतली आहे. भाजपचे जिल्हाध्यक्ष चेतन सिंह केदार हे सांगोला तालुक्यातील चोपडा गटातून तर अजित पवार गटाचे जिल्हाध्यक्ष उमेश पाटील हे कुरुल गटातून लढत आहेत. उत्तर सोलापूर तालुक्यातील बीबीदारफळ गटातून भाजपची इंद्रजीत पवार आणि राष्ट्रवादीकडून माजी जीप अध्यक्ष बळीराम काका साठे यांच्यात चुरशीचा सामना होणार आहे. शिंदे सेनेचे जिल्हाप्रमुख चरण राज चौरे हे पेनुर गटातून तर विजयराज डोंगरे हे आष्टी गटातून लढत आहेत. माजी आमदार दिगंबर बागल यांच्या कन्या रश्मी बागल यादेखील झेडपीच्या निवडणुकीच्या मैदानात उतरल्या आहेत. माजी आमदार रतिकांत पाटील यांनी पत्नी लक्ष्मीबाई यांना हत्तुर गटातून शिंदे सेनेची उमेदवारी मिळवली आहे. काँग्रेसचे माजी मंत्री आनंदराव देवकते यांचे नातू सतीश हे औराद पंचायतीत समितीसाठी उभारले आहेत. एकूणच या जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीत आमदार तसेच माजी आमदारांनी आपल्या कुटुंबातील सदस्यांनाच उमेदवारी देण्यास प्राधान्य दिले आहे

