सोलापूर । जिल्हा परिषदेचे मुख्य लेखा व वित्त अधिकारी अजय पवार यांनी आज प्राथमिक आरोग्य केंद्र होटगी येथे कोरोना लसीकरणाचा दुसरा डोस घेतला. यावेळी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. शितलकुमार जाधव, प्रशासन विभागाचे कनिष्ठ प्रशासन अधिकारी शिवानंद मागे, आय टी सेलचे त्रिमूर्ती राऊत, माध्यम विस्तार अधिकारी रफिक शेख, पतसंस्था क्रमांक 1 चे श्रीशैल्य देशमुख यांनी सुध्दा कोरोना लसीकरणाचा दुसरा डोस घेतला. यावेळी वैद्यकीय अधिकारी डॉ मिसाळ उपस्थित होते.
यावेळी मुख्य लेखा व वित्त अधिकारी अजय पवार यांच्या वतीने व शुभहस्ते प्राथमिक आरोग्य केंद्र परिसरात वृक्षारोपण करण्यात आले. वृक्षारोपणाचा शुभारंभ जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ शितलकुमार जाधव यांच्या शुभहस्ते करण्यात आला. यावेळी अंबा, आवळा, पेरू, कढीपाला, चिक्कु आणि जाभळाच्या रोपांचे रोपन करण्यात आले. यावेळी प्राथमिक आरोग्य केंद्राच्या कर्मचाऱ्यांकडूनही वृक्षारोपण करण्यात आले. एकुण पंचवीस रोपांची यावेळी लागवड करण्यात आली. यावेळी आरोग्य सहाय्यक केदार गद्दी, सुभाष सतारवाले,श्रीम शिंदे जे एस आरोग्य सहाय्यिका, आरोग्य सेवक झाकीर हुसेन सय्यद, अंबादास मिठापल्ली, रूपेश गायकवाड, श्रीम कंचे एन पी आरोग्य सेविका श्रीम पवार व्हि जी आरोग्य सेविका आदी उपस्थित होते.