सोलापूर– सोलापूर जिल्ह्यातील सेवानिवृत्त शिक्षकांकडून पूरग्रस्त गावातील मुक्या जनावरासाठी पशुखाद्य सोमवारी सकाळी ११ वाजता जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम सो यांच्या हस्ते पशुधन अधिकारी विशाल येवले शिक्षणाधिकारी कादर शेख यांच्या उपस्थितीत वाटप करण्यात येणार आहे.
सिना भिमा नदीच्या खोर्यातील दक्षिण सोलापूर तालुक्यातील गावांना पुराचा तडका बसल्याने मुक्या जनावर वैरणाअभावी दावणीवर उपाशी बसलेत जिल्ह्यातील व राज्यातील जिल्हा परिषद सेवानिवृत्त शिक्षक १,६०,००० रोख रक्कम गोळा करून ७ टन पशुखाद्य खरेदी करून मुक्या जनावरांना वाटप करणार आहेत सोमवारी जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधीकारी कुलदीप जंगम साहेबांच्या दालना समोर ३ गावातील शेतकर्याना पशुखाद्य वाटप करणार आहेत अशी माहिती संयोजक शिवानंद भरले, सुभाष फुलारी, रमेश गायकवाड, मल्लिकार्जुन बडदाळ, काळप्पा सुतार यांनी दिली आहे