युवा स्पंदन सांस्कृतिक महोत्सव २०२५ चे उद्घाटन
सोलापूर, दि. २ एप्रिल
युवा स्पंदन सांस्कृतिक महोत्सव हा केवळ एक उत्सव नाही, तर तरुणाईच्या ऊर्जेचा, सर्जनशीलतेचा आणि भारतीय संस्कृतीच्या वैभवाचे प्रतिबिंब आहे. असे प्रतिपादन अखिल भारतीय मराठी नाट्यपरिषदेचे सोलापूर उपनगरिय शाखेचे अध्यक्ष विजय साळुंखे यांनी केले.

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ येथे विद्यार्थी कल्याण विभागाच्या यतीने युवा स्पंदन सांस्कृतिक महोत्सव २०२५ चे आयोजन करण्यात आले आहे. या महोत्सवाच्या उद्घाटन प्रसंगी विजय साळुंखे बोलत होते. यावेळी व्यापसपीठावर कुलगुरु डॉ. प्रकाश महानवर, प्र. कुलगुरु लक्ष्मीकांत दामा, कुलसचिव योगिनी घारे, विद्यार्थी विकास विभागाचे संचालक डॉ. केदारनाथ काळवणे, युवा स्पंदनचे समन्वयक डॉ. विकास कडू उपस्थित होते. यावेळी मान्यवरांच्या हस्ते पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पन आणि दिप प्रज्वलन करुन उद्घाटन करण्यात आले. युवा स्पंदन सांस्कृतिक महोत्सवात विद्यापीठातील ११ संकुलातील विविध अधिविभागातील २५० विद्यार्थ्यांनी 14 कला प्रकारात सहभाग नोंदवला आहे.

यावेळी बोलताना साळुंखे म्हणाले, तरुणांनी नाटके, एकांकीका पाहिल्या पाहिजेत. ज्यामुळेन नाटक चळवळ जिवंत राहील. मराठी नाट्य चळवळीला मोठी परंपरा आहे. याच्या माध्यमातुन अनेक कलाकार निर्माण झाले आहेत. सांस्कृतिक महोत्सव विद्यार्थ्यांसाठी एक पर्वणी असते. अभ्यासाच्या धावपळीतून थोडा विसावा मिळतो आणि आपल्यातील सुप्त गुणांना वाव मिळतो. नृत्य, संगीत, नाटक, चित्रकला अशा विविध कलांच्या माध्यमातून तुम्ही स्वतःला व्यक्त करता आणि तुमच्या भावनांना वाट मोकळी करून देता. या महोत्सवातून विविधरंगी कलांचे दर्शन होते. असेही साळुंखे यांनी स्पष्ट केले.
यावेळी कुलगुरु डॉ. प्रकाश महानवर म्हणाले, या महोत्सवात केवळ नृत्य, गायन किंवा नाटकांसारख्या पारंपरिक कलांचाच समावेश नाही, तर समकालीन कला, साहित्य आणि तंत्रज्ञानाचाही सुंदर संगम आपल्याला पाहायला मिळत आहे. हे आपल्या विद्यार्थ्यांची दूरदृष्टी आणि बदलत्या जगाला स्वीकारण्याची तयारी दर्शवते. आजच्या धावपळीच्या जीवनात, आपल्याला आपल्या संस्कृतीपासून दूर जाण्याची शक्यता असते. पण अशा सांस्कृतिक महोत्सवांच्या माध्यमातून आपण आपल्या परंपरा आणि मूल्यांशी जोडले राहतो. या महोत्सवातून आपण एकता, बंधुभाव आणि सांघिकतेचे महत्त्व शिकतो, जे आपल्या भावी आयुष्यात खूप उपयोगी ठरेल. असेही कुलगुरु डॉ. महानवर यांनी स्पष्ट केले.
कार्यक्रमाचे प्रस्ताविक डॉ. केंदारनाथ काळवणे यांनी केले. कार्यक्रमाचे सुत्रसंचलन प्रा. ममता बोल्ली, प्रा. श्रुती देवळे यांनी केले तर आभार डॉ. विकास कडू यांनी मानले. कार्यक्रमाला विविध संदलाचे संचालक, प्राध्यापक, पशासकीय अधिकारी, कर्मचारी आणि विद्यार्थी मोठ्या संखेने उपस्थित होते.