राष्ट्रीय काँग्रेसचे नेत्या सोनियाजी गांधी व अखिल भारतीय काँग्रेस वर्किंग कमिटी सदस्या आमदार प्रणितीताई शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त 5 डिसेंबर ते 28 डिसेंबर 2023 पर्यंत विविध कार्यक्रम घेण्यात येणाऱ्या सोलापूर शहर युवक काँग्रेसच्या युथ आयकॉन फेस्टिवल-2023 पोस्टरचे लॉन्चिंग माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे साहेब,काँग्रेस शहराध्यक्ष चेतन नरोटे,जिल्हा कार्याध्यक्ष सुरेश हसापुरे,युवक काँग्रेस अध्यक्ष गणेश डोंगरे यांच्या हस्ते करण्यात आले.
दरवर्षी सोलापूर युवक काँग्रेस वतीने शहरांमधील प्रभागामध्ये विविध ठिकाणी कला, क्रीडा, सामाजिक कार्यक्रम घेण्यात येते. या कार्यक्रमांमध्ये लेदर बॉल क्रिकेट स्पर्धा,प्रो कबड्डी स्पर्धा,महाआरोग्य शिबीर, रक्तदानशिबिर, युथ आयकॉन पुरस्कार,MPSC,UPSC अभ्यास केंद्र साहित्य वाटप, 9 डिसेंबर रोजी जन्मणाऱ्या मुलींना किट वाटप,महिला महाविद्यालय मध्ये व्याख्याने, शालेय विद्यार्थ्यांना साहित्य वाटप, शासनाचे विविध मोफत दाखले शिबिर,महिलांना साड्या वाटप, गोरगरिबांना चादर वाटप,अनाथाश्रमात विद्यार्थ्यांसमवेत वाढदिवस साजरा व अन्नदान,आपुलकी बेघर निवारण केंद्र येथे जीवनावश्यक वस्तूंचे वाटप अशा विविध कार्यक्रमांचे संपूर्ण डिसेंबर महिनाभरात आयोजन करण्यात आले आहे.
पोस्टर लॉन्च केल्यानंतर सुशीलकुमार शिंदे साहेब म्हणाले की युवक काँग्रेस सोनियाजी गांधी व प्रणिती ताईंचा वाढदिवसानिमित्त चांगल्या पद्धतीने सामाजिक उपक्रम राबवतात.जेणेकरून समाजाला त्याचा उपयोग झाला पाहिजे. असेच कार्यक्रम युवक काँग्रेस दरवर्षी करतात. दरवर्षी युवा प्रेरणा सप्ताह सात दिवसांचा असतो परंतु यावर्षी युवक काँग्रेसने महिनाभरात युथ आयकॉन फेस्टिवल चा आयोजन केले आहे हे खूप कौतुकास्पद आहे असे ते म्हणाले.
यावेळी युवक काँग्रेस अध्यक्ष गणेश डोंगरे, प्रदेश सचिव श्रीकांत वाडेकर, प्रवीण जाधव,उत्तर विधानसभा अध्यक्ष महेश लोंढे, दक्षिण विधानसभा अध्यक्ष महेश जोकारे, प्रवक्ता दाऊद नदाफ, शरद गुमटे,विवेक इंगळे,धीरज खंदारे,आकाश जांभळे, युवराज जाधव,प्रतीक शिंगे,चंद्रकांत नाईक, महेंद्र शिंदे, गणेश वाघमारे,श्याम केंगार, अजितकुमार साबळे, मनोहर चकोलेकर आदी पदाधिकारी उपस्थित होते