सोलापूर : बुधवारी सोलापूर शहरात ज्ञान प्रबोधनी शाळेपासून डफरीन चौकातील सोलापूर पेट्रोल पंपापर्यंत युवक काँग्रेसच्या अंबादास करगुळे, विनोद भोसले, तिरुपती परकीपंडला आदींनी चारचाकी गाडी ओढत आंदोलन केले. मोदी तेरा कैसा खेल, सस्ती दारू महंगा तेल अशा घोषणा यावेळी देण्यात येत होत्या . चार चाकी मोटारीला दोरखंड लावून ही गाडी कार्यकर्ते ओढत नेते होते.