सोलापूर : नोकरी डॉट कॉम वरून बोलत असल्याचे सांगून आरती राजशेखर नरोणे यांच्या एटीएम कार्ड ची माहिती घेऊन एचडीएफसी बँकेतील अकाउंट मधील २९ हजार रुपये काढून घेऊन फसवणूक केल्याची तक्रार जोडभावी पेठ पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे. पोलीस सब इन्स्पेक्टर दाईंगडे अधिक तपास करीत आहेत.