सोलापूर : राहत्या घरी बेडरूममधील पंख्याला साडीच्या साहाय्याने गळफास घेऊन तरुणाने आत्महत्या केली. राजाराम शिवाजी चौधरी (वय २२, रा. रोहिणी नगर भाग ३ सैफुल) असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे. ही घटना बुधवार रात्री एक वाजण्याच्या सुमारास घटना घडली. तरुणाने अचानकच आत्महत्या केल्यामुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. त्यांच्या पश्चात आई, वडील, दोन भाऊ आहे.या घटनेची नोंद सिव्हिल चौकीत झाली आहे.