निरोगी तन आणि शांत मन म्हणजे योग असे म्हणतात ते अगदी खरे आहे.शरीराचं आणि मनाचं आरोग्य उत्तम राखण्यासाठी योग अतिशय महत्वाचा आहे. निरोगी आयुष्यासाठी योगासन अतिशय महत्वाचे आहेत.योगाचे फायदे ही खूप आहेत. २१ जून हा दिवस जगभरात “आंतरराष्ट्रीय योग दिवस” म्हणून साजरा केला जातो. योगाचे महत्त्व ओळखून पोदार इंटरनॅशनल स्कूल मध्येही योग दिन साजरा करण्यात आला. या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून संतोष संगवे सर योग प्रशिक्षक ,सोलापूर, प्रशालेचे प्राचार्य समरेन्द्र पाणिग्रही सर, प्रशालेचे प्रशासकीय अधिकारी नदाफ व्ही. सी.सर, जम्बो किडच्या मुख्याध्यापिका आरती जवेरी मॅडम, मनुष्य संसाधन विभाग प्रमुख विनायक साळुंखे आदी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रशालेतील विद्यार्थिनी आराध्या बुरबुरे हिने केले. तर योगाचे महत्व ओवेस यांने विशद केले. या कार्यक्रमातून विद्यार्थ्यांना योगाचे धडे देण्यात आले. याचबरोबर मैदानावर विद्यार्थ्यांकडून योगा करताना PODAR या इंग्रजी शब्दाची प्रतिकृती तयार करण्यात आली. कार्यक्रमादरम्यान विद्यार्थी नृत्यातून योगा सादर करण्यात आला. गायन वादनातून विद्यार्थ्यांना मन शांती स्वास्थ्यासाठी मंत्रमुग्ध करण्यात आले. यावेळी संतोष संगवे प्रशालेचे प्राचार्य शसमरेन्द्र पाणिग्रही यांनीही योग दिनाचे महत्त्व सांगितले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कु. अक्षरा चव्हाण हिने तर आभार प्रदर्शन कुमारी हिरण्मयी हिने केले.