आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त केंद्रीय संचार ब्यूरो आणि विविध योग संस्थाचा उपक्रम…
सोलापूर -निरोगी आरोग्यासाठी नियमित योग करणे आवश्यक आहे. योगासने, प्राणायाम, ध्यान केल्याने शरीराला शांती व सुख मिळते. अश्या प्राचीन व शात्रोक्त असेलेल्या भारतीय योगाची माहिती व जाणीव जागृती व्हावे या उद्देशाने केंद्र शासनाचे माहिती व प्रसारण मंत्रालय, केंद्रीय संचार ब्यूरो, सोलापूर आणि योग दिवस समन्वय समिती, सोलापूर यांच्या सयुंक्त विद्यमाने दिनांक १८ जून रोजी सकाळी ०७.०० वाजता ह.भ.प. आप्पाराव बचुटे उद्यान, दमाणी नगर, सोलापूर येथे योग दिंडीचे आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती केंद्रीय संचार ब्यूरोचे सहायक प्रसिद्धी अधिकारी अंबादास यादव यांनी दिली आहे.
सदर दिंडीच्या उद्घाटनासाठी सोलापूर महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त रवी पवार आणि पोलीस उपायुक्त अजित बोऱ्हाडे आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत. सदर दिंडीमध्ये शहरातील पतंजली योग पीठ, योग सेवा मंडळ, विवेकानंद केंद्र, योग साधना मंडळ, भारतीय योग संस्था, योग प्रभा मंडळ, योग असोसिएशन, गीतापरिवार सर्व कल्याण योग, रामचंद्र मिशन आणि सर्वोदय योग मंडळाचे पदाधिकारी, युवक आणि नागरिक सहभागी असणार आहेत.
सदर योग दिंडी सकाळी ०७.०० वाजता आप्पाराव बचुटे उद्यान येथून पावन गणपती- लक्ष्मी नगर- गंगा नगर-जगताप हॉस्पिटल-मरीआई चौक-सन सिटी रोड आणि आप्पाराव बचुटे उद्यान येथे समारोप होईल. सदर योग दिंडीमध्ये नागरीकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन आयोजाकाकडून करण्यात आले आहे.