येस न्युज मराठी नेटवर्क : जुनी मिल आवारातील संभाजीराव शिंदे विद्यामंदिर येथे 21 जून जागतिक योगा दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.कार्यक्रमाचे प्रमुख मार्गदर्शक म्हणून पतंजली किसान सेवा समिती जिल्हा प्रभारी भगवान बनसोडे, योग शिक्षक लिंगप्पा गडदे यांचे मार्गदर्शन लाभले.प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते संस्थेचे संस्थापक स्वर्गीय विष्णुपंत तात्यासाहेब कोठे व सरस्वतीच्या प्रतिमांचे पूजन करण्यात आले. मुख्याध्यापक नागेश कुमार काटकर यांनी पाहुण्यांचे स्वागत व कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले.
या कार्यक्रमात विद्यार्थी व शिक्षकांकडून विविध सूक्ष्म व्यायाम, आसने व प्राणायाम यांचा सराव करण्यात आला व योग प्राणायामाचे महत्त्व सांगण्यात आले.शाळेच्या वतीने प्रमुख मान्यवरांचा सत्कार करण्यात आला. या वेळी पोलीस हेडकॉन्स्टेबल श्रीराम मुद्दे, नाना कुरडे आदी पतंजली साधकां बरोबर बहुसंख्य शिक्षक व विद्यार्थी सहभागी झाले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन बिभीषण सिरसट यांनी केले तर आभार मुख्याध्यापिका राजश्री नारायणकर यांनी मानले. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले