सोलापूर प्रतिनिधी/समाधान रोकडे उत्तर सोलापूर तालुक्यातील पडसाळी गावात कालच्या पावसाने गावातील तसेच शेतातील तळे, नाले ओढे तसेच कॅनेल ओव्हरफुल भरून वाहू लागले आहेत त्यामुळे अनेक शेतकऱ्यांचे सोयाबीन,उडीद, कांदा,मका तसेच इतर पिकांचे खूप मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.
गेल्या आठ दिवसांपासून सोलापूर तसेच उत्तर सोलापुरात तालुक्यातील पावसाने चांगलाच हाहाकार माजवला आहे.कालच्या पावसाने चोहीकडे पाणीच पाणी दिसत आहे अनेक या पाण्याने शेतकऱ्याचे बांध तुटले आहेत तसेच वाहतुकीचा रस्ता हा पाण्याचा मार्ग झाल्याचे दिसत आहे शासन याकडे कधी लक्ष देणार ? शेतकऱ्या वर आलेले हे नैसर्गिक संकट शासन दूर करणार का? या अनेक प्रश्नाने शेतकरी हवालदिल झाल्याचे दिसत आहे.शासनाने शासनाने शेतकऱ्याकडे जातीने लक्ष घालून झालेल्या पिंकाचे पंचनामे करून नुकसान भरपाई द्यावी अशी शेतकऱ्यांमधून चर्चा होत असल्याचे ऐकायला मिळत आहे.