सोलापूर : जागतिक छायाचित्र दिनानिमित्त फोटोग्राफर बहुउद्देशीय संघ, शहर व जिल्हा सोलापूर यांच्या वतीने मंगळवार, दि. १९ ऑगस्ट २०२५ रोजी निर्मलकुमार फडकुले सभागृहात भव्य सोहळ्याचे आयोजन करण्यात आले.



या प्रसंगी ज्येष्ठ छायाचित्रकार माननीय विश्वनाथ बेताळे यांना जीवन गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. तसेच विजय आवटे, मनोहर भालेकर, शौकत कुरेशी, इरफान पठाण आणि सुरेश लकडे या ज्येष्ठ छायाचित्रकारांचा विशेष सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमास उपस्थित फोटोग्राफर्ससाठी चंदू काका सराफ यांच्या वतीने लकी ड्रॉ आयोजित करण्यात आला होता. यातून निवडलेल्या तीन विजेत्यांना चांदीची नाणी भेट देण्यात आली.


सत्कार सोहळ्यानिमित्त आयोजकांनी व्यक्त केले की,
“छायाचित्र हे केवळ चित्र नसून ते संस्कृती, भावना आणि काळाचा ठेवा आहे. ज्येष्ठ छायाचित्रकारांचे योगदान हे भावी पिढ्यांसाठी प्रेरणादायी दिशा ठरणार आहे.”
कार्यक्रमाला मोठ्या संख्येने फोटोग्राफर्स, मान्यवर व छायाचित्रप्रेमी उपस्थित होते.