टाळ मृदुंगाचा गजर करत… वारकरी पाऊल खेळत येस न्यूज मराठीच्या गणरायाची शनिवारी सकाळी पालखीतून विसर्जन मिरवणूक काढण्यात आली.प्रारंभी ह भ प ज्योतीराम चांगभले महाराज तसेच बळीराम जांभळे महाराज यांच्या हस्ते येस न्यूज मराठीच्या गणरायाची बाल वारकऱ्यांसमवेत आरती करण्यात आली. गणपती बाप्पा मोरया पुढच्या वर्षी लवकर या अशा घोषणा यावेळी देण्यात आल्या.
येस न्यूज मराठीच्या गणरायाची अवंती नगर येथील कार्यालयापासून पालखीतून मिरवणूक काढण्यात आली. अरविंद धाम प्रवेशद्वार.. पद्मश्री अपार्टमेंट ते छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा या मार्गावरून टाळ मृदुंगाचा गजर करत बालगोपाळांनी ही एसएमएस मराठीची गणरायाची विसर्जन मिरवणूक भक्तीमय केली.
छत्रपती संभाजी महाराजांच्या पुतळ्याला यावेळी अभिवादन करून उपस्थित आणि घोषणा दिल्या. इथून पुन्हा एस न्यूज मराठीच्या कार्यालयाकडे ही विसर्जन मिरवणूक निघाली. या विसर्जन मिरवणुकीत उद्योजक सुधीर पाटील, प्रकाश बिराजदार, संतोष उदगिरी, कार्यालयासमोर आल्यानंतर सेवानिवृत्त पीएसआय शंकरराव खंडागळे, समाजसेवक वसंतराव जाधव, प्रमोद शेळगीकर यांच्या हस्ते गणरायाची आरती करण्यात आली. कार्यालयाच्या बाहेर ठेवण्यात आलेल्या मोठ्या बॅरलमध्ये पाणी भरून त्यामध्येच येस न्यूज मराठीच्या इको फ्रेंडली गणरायाचे विसर्जन करण्यात आले. या मिरवणुकीत येस न्यूज मराठीची संपादक शिवाजी सुरवसे, विजय आवटे, शिवानंद जाधव, गीतांजली, हर्षाली, सिद्धी आणि शांता सुरवसे, राजेश भोई, महेश चवरे, मनमोहन भोसले, प्रशांत काळे, रवीकांत फुटाणे, राणी इंगळे आदी सहभागी झाले होते. बालगोपालांना महाप्रसाद देऊन या गणेशोत्सवाचा समारोप करण्यात आला.










