येस न्युज नेटवर्क : भारतीय कुस्तीपटू अमन सेहरावतने चमकदार कामगिरी करत पॅरिस ऑलिम्पिक 2024 च्या उपांत्यपूर्व फेरीत विजय मिळवला. त्याने उपांत्यपूर्व फेरीत अल्बेनियाच्या झेलीमखानचा पराभव केला. अमनने हा सामना 11-0 ने जिंकला. अमन सेहरावतने उपांत्य फेरीत धडक मारली आहे. आता त्याचा सामना जपानच्या रे हिगुचीशी होणार आहे.