येस न्युज मराठी नेटवर्क : सोलापुरातील जुने श्रीराम मंदिर आणि नवीपेठेतील जवळगेकर यांच्या वाड्यातील नवीन राम मंदिर येथे श्रीराम जन्मोत्सवाची सुरुवात गुढी पाडव्याला साडेतीन मुहूर्तावर करण्यात आली. श्रीराम मंदिरामध्ये नऊ दिवस पूजा अर्चा , भजन कीर्तन तसेच नित्य_उपचार करण्यात येतात. यंदा कोरोनाचे संकट असल्यामुळे दोन्ही राम मंदिरे दर्शनासाठी भाविकांना बंद ठेवण्यात आली आहेत. जुन्या राम मंदिरात रामदासी बुवा यांनी विधीवत पूजन केले. नव्या पेठेतील जवळगेकर यांच्या श्रीराम मंदिरात मित्रगोत्री यांनी पूजा केली व सतीश गोरे यांनी पवमानाचे पठण केले. नवीपेठेतील श्रीराम मूर्तीची स्थापना गोंदवलेकर महाराजांनी १९१७ मध्ये जवळगेकर यांच्या राहत्या वाड्यात केलेली आहे त्यानंतर याच वाड्यामध्ये जवळेकर यांनी शके १८३९मध्ये श्रीरामाचे मंदीर उभारले.