भवानी पेठ, घोंगडे वस्ती येथील जेमिनी सांस्कृतिक व क्रीडा बहुउद्देशीय संस्थेने स्थापन केलेल्या शक्ती देवीची पूजा मानकरी मल्लिकार्जुन चोपडे यांच्या हस्ते करण्यात आली.
जेमिनी मातेची प्राणप्रतिष्ठापना रविवारी सायंकाळी ६ वाजता मोठ्या भक्तीमय व मंगलमय वातावरणात, पारंपारिक वाद्यासह मिरवणुकीने करण्यात आली.यावेळी सर्व ट्रस्टी सभासद, पदाधिकारी तसेच देवी भक्तांनी मोठ्या उत्साहात मिरवणुकीमध्ये सहभागी झाले होते.
यावेळी महानगरपालिकेचे माजी सभागृह नेता सुरेश पाटील, ट्रस्टी अध्यक्ष सदाशिव पाटील, ताता लगमण्णा, ताता यलदंडी, दत्तात्रय पल्ली, सिद्राम तेग्गेळी, नरसप्पा मंदकल, बसवराज भाईकट्टी, लिंगप्पा पुजारी, ताता बाडद, सिद्धरामय्या पुराणीक, बंडोपंत डोळे, बसवराज जाटगल, दत्ता डबरे, माळप्पा करली, हणमंतू मंदकल, शिवलीगं कोळी, गोपाळ कुरले, मंडळाचे अध्यक्ष प्रकाश पुजारी, यलप्पा डबरे, युवा नेते बिपीनभैय्या पाटील, माजी अध्यक्ष बसवराज करली, अनिल कडगुडा, पवन तगारे, नागराज डबरे, गंगाराम डोळे, यशवंत पुराणीक, राहूल संकाराम, कुमार शिरसगीकर, मल्लू कोळी, प्रभाकर बद्दल, आकाश जेरकल, प्रविण कैरमकोंडा, व्यंकटेश जाटगल, शिवानंद मंदकल, विशाल हलसगी, सतोष करली, अबरेश चिंचोळकर, सागर हलसगी, नागराज करली, आकाश जमादार, किरण मेटी, विनायक पाटील, मल्लिकार्जुन करली, भिमा गंदाळकर, प्रशांत कलशेट्टी, सचिन कोठे, सुरेश मेटी, राहूल मजगे, नागेश गंदाळकर, सिद्राम मंदकल, अंबादास कोळी, विश्वनाथ रानसर्जे, ऍड. बटु्टु, नविन गोटीमुकूल, अजय कडगुडा, प्रशात गाडेकर, चद्रकांत गंदाळ, प्रभू कोळी, सिद्राम डोळे, प्रविण डोळे, बालाजी गुजा, रवी मंदकल, सुरेश मंदकल, विकी जाटगल, गुडू कलशेट्टी, विजय कोळी उपस्थित होते. आई राजा उदे उदे सदानंदीचा उदे उदे भवानी माते की जय असा जयजयकार शक्ती देवीच्या भक्ताने केला.
नवरात्रोत्सव कालावधीमध्ये धार्मिक कार्यक्रमाबरोबरच भजन भारुड कीर्तनाच्या माध्यमातून जनजागृती करण्यात येणार असून रक्तदान शिबिराला प्रचंड प्रतिसाद मिळाला आहे महिला भगिनींसाठी कुंकुमार्चन, बतुकंमा, सुंदरी वादन यासह पारंपारिक कलाविष्कार होणार आहेत. जेमिनी सांस्कृतिक व क्रीडा बहुउद्देशीय संस्थेच्या वतीने होणाऱ्या या कार्यक्रमात शहरवासीयांनी सहभागी व्हावे असे आवाहन माजी सभागृह नेता सुरेश पाटील यांनी केले आहे.