येस न्युज मराठी नेटवर्क : (अनिकेत पाटील) उत्तर सोलापूर मधील डोणगाव येथे आज जागतिक माती दिवस साजरा करण्यात आला. माती हा अत्यंत महत्त्वाचा पण नेहमीच दुर्लक्षित राहिलेला स्त्रोत आहे. या घटकाकडे जगभरातील लोकांचे लक्ष वेधणे तसेच मातीच्या संवर्धनाची असलेली गरज याबाबत जनजागृती करण्यासाठी 5 डिसेंबर हा ‘जागतिक मृदा दिन’ म्हणून साजरा करण्यात येतो. या उद्देशाने डोणगाव येथील मारुती मंदिरात जागतिक मृदा दिन साजरा करण्यात आला.
यावेळी कृषी सहाय्यक स्मिता काळे, मंडळ अधिकारी D.B क्षिरसागर, स्वयं शिक्षण प्रयोग संस्था सावित्री पाटील, राणी दगडे, साधना सराटे ,शेतकरी रेवन खजूरकर, बाबा आमले,रमेश पाटील, तसेच गावातील शेतकरी आणि ग्रामस्थ उपस्थित होते.