येस न्युज मराठी नेटवर्क : भारत भूमीला स्वातंत्र्य मिळण्यासाठी अनेकांनी बलिदान दिले आहे. त्यांचे स्मरण राहावे आणि महान भारत भूमीचे स्वातंत्र्य अबाधित, सुव्यवस्थित, स्वच्छ, आरोग्यदायी ठेऊन एक आदर्श भारत बनावा. यासाठी राष्ट्रीय स्वातंत्र्यता एकता, समता, बंधुता अखंडता इ. महत्त्वाच्या मुल्यान्वये .राष्ट्रीय अस्मितेची जपणूक करून देशविदेशातील प्रत्येक भारतीयांच्यामध्ये राष्ट्राभिमान रुजविण्यासाठी साहित्याने पुढे आले पाहिजे. या उद्देशाने ९ व १५ ऑगस्ट स्वातंत्र्य दिनाच्या अनुषंगाने राष्ट्रीय विषयावर काव्य स्पर्धेचे आयोजन:
सुवर्णधन मराठी ज्ञानोपासक प्रतिष्ठान व माऊली महाविद्यालय वडाळा येथील मराठी विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने करीत आहे .तरी या स्पर्धेत युवा स्पर्धकांनी बहुसंख्येने सहभागी व्हावे .
स्पधेऀचे नियम व अटी पुढीलप्रमाणे ;.
१)या स्पर्धेमधील कविता फक्त, राष्ट्रीय कविता या काव्य प्रकारातीलच असावी आणि ती स्वरचित असावी.
२) कवितेचे शीर्षक, कविता, कवीचे पुर्ण नाव, पत्ता, ईमेल, भ्रमणध्वनी, लिहावा.
३) लेखन युनिकोडमध्ये /मोबाईलवर टाईप करुन maulimarathi @gmail.com या ईमेलवर पाठवावी. यथावकाश त्यांना प्रकाशित केलं जाईल.
४) कुणाच्याही भावना दुखावतील असे आक्षेपार्ह लेखन टाळावे.
५) कविता पाठविण्याची अंतिम मुदत ५ सप्टेंबर २०२१ आहे स्पर्धेचा अंतिम निर्णय परीक्षकांचा राहील.
६) विजेत्यांना बक्षीस वितरणाची व्यवस्था व तारीख कोरोना परिस्थिती नुसार कळविण्यात येईल
विजेत्यांचा योग्य तो सन्मान केला जाईल
कार्याध्यक्ष
डॉ.सौ.सुवर्णा धनंजय चव्हाण-गुंड
सुवर्णधन मराठी ज्ञानोपासक प्रतिष्ठान
विश्वस्तरीय राष्ट्रीय काव्य स्पर्धा २०२१
भ्रमणध्वनी-९८२२१३३३२६