येस न्युज मराठी नेटवर्क : सोलापूर ग्रामीण विभागाच्या पोलीस अधीक्षकांनी ई पास काढण्याकरिता कार्यपद्धती जाहीर केली आहे . ऑनलाइन पद्धतीने https://covid19.mhpolice.in या लिंक वरून नागरिकांनी ई -पास काढावा, असे आवाहन जनसंपर्क अधिकाऱ्यांनी केले आहे. प्रवाशांकरिता सूचना देताना पोलिस अधीक्षकांनी म्हटले आहे की, प्रवाशांना ज्या ठिकाणाहून प्रवास करण्याचे प्रयोजन आहे त्या ठिकाणच्या जिल्हा शहरातून प्रवासी परवानगी करिता अर्ज करणे आवश्यक आहे.
ज्या ठिकाणी जायचे आहे अशा ठिकाणी अर्ज करू नये याची कृपया नोंद घ्यावी, असेही परिपत्रकात म्हटले आहे. वैद्यकीय आपत्कालीन परिस्थिती ,अंत्यसंस्कार व त्या संबंधित विधी आणि कुटुंबातील व्यक्तींचे गंभीर आजाराचे उपचार का जाणे आवश्यक असल्यास, त्याचप्रमाणे नोकरीच्या ठिकाणी हजर होण्याकरता, लग्न समारंभास जाण्याकरिता प्रवास करणे, अत्यंत आवश्यक असल्यास, अत्यावश्यक सुविधा देणारे अधिकारी अशांना ही पास देण्यात येणार असल्याचे ग्रामीण पोलिसांनी स्पष्ट केले आहे.