येस न्युज मराठी नेटवर्क : केगाव देगाव रोड वर देशमुख पाटील वस्ती जवळ हायवे ब्रिजचे काम चालू असताना लोखंडी राफ्ट अंगावर कोसळल्याने रमजान आत्तार या कामगाराचा जागीच मृत्यु झाला . कामाच्या ठिकाणी सुरक्षिततेसाठी वाहन अथवा क्रेन न ठेवल्याने दर्शन अच्युत भोसले यांनी फिर्याद दिली असून याप्रकरणी दीपक कुमार स्वाईन ,शिंदे ,सत्यजित निंबाळकर ,आणि संताजी घोरपडे यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फौजदार चावडी पोलिस स्टेशनचे सब इंस्पेक्टर मंदृपकर अधिक तपास करीत आहेत