सोलापूर शहरात अवंती नगर परिसरात रेल्वे बोगदा अर्थात रेल्वे अंडर ब्रिजचे काम बऱ्याच दिवसापासून रखडले होते मात्र आता या कामाने चांगलीच गती घेतली आहे त्यामुळे जुना पुना नाका म्हणजेच छत्रपति संभाजी पुतळा ते अवंती नगर ते देगाव सीएनएस हॉस्पिटल कडे जाणाऱ्या नागरिकांसाठी मोठा दिलासा मिळणार आहे .रस्ते विकास महामंडळाने हा अर्धवट रस्ता केला होता त्यानंतर आता महापालिका नगर योजनेतून रेल्वे ट्रॅकच्या पुढील रस्ता वीस कोटी रुपये खर्चून विकसित करत आहे.रेल्वे बोगद्याच्या कामासाठी महापालिकेने रेल्वेकडे निधी जमा केल्यामुळे रेल्वेकडून हे काम सुरू आहे. पावसाळ्यापूर्वी हे काम पूर्ण होईल असे कामाच्या गतीवरून दिसते. मात्र काही राजकीय पुढाऱ्यांच्या हट्टापायी सुरुवातीलाच पुना नाका येथे रस्त्यावरच थाटलेल्या आठ ते दहा झोपड्यांच्या पुनर्वसनाचा प्रश्न तसाच राहिल्यामुळे इथे देखील रस्ता निमुळता आहे त्यामुळे महापालिका याकडे लक्ष देऊन हा रस्ता व्यवस्थित करेल का असा या भागातील नागरिकांचा प्रश्न आहे.
