नवी दिल्ली : 1976 मध्ये पारित झालेल्या 42 व्या दुरुस्तीनुसार संविधानाच्या प्रास्ताविकात “समाजवादी” आणि “धर्मनिरपेक्ष” या शब्दांचा समावेश करण्याला आव्हान देणाऱ्या याचिका न्यायालयाने फेटाळल्या आहेत. सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश संजीव खन्ना आणि न्यायमूर्ती संजय कुमार यांच्या खंडपीठाने सांगितले की, संसदेचा दुरुस्ती अधिकार प्रस्तावनेपर्यंत देखील विस्तारित आहे. प्रस्तावना स्वीकारण्याच्या तारखेमुळे प्रस्तावनेत सुधारणा करण्याच्या संसदेच्या अधिकारावर मर्यादा येत नाही. या आधारे याचिकाकर्त्यांचा युक्तिवाद फेटाळण्यात आला.
सुनावणीदरम्यान सरन्यायाधीश म्हणाले की, जवळपास इतकी वर्षे झाली, आता हा मुद्दा का उपस्थित केला जात आहे. भारतातील समाजवाद समजून घेण्याची पद्धत इतर देशांपेक्षा खूप वेगळी खंडपीठाने हे प्रकरण मोठ्या खंडपीठाकडे पाठवण्याची याचिकाकर्त्यांची याचिका फेटाळली होती. तथापि, काही वकिलांच्या अडवणुकीमुळे नाराज होऊन सरन्यायाधीश खन्ना हे आदेश देणार होते, परंतु त्यांनी सोमवारी आदेश सुनावणार असल्याचे सांगितले. संजीव खन्ना यांनी 22 नोव्हेंबर रोजी सुनावणी दरम्यान सांगितले, “भारतीय अर्थाने समाजवादी असणे हे केवळ कल्याणकारी राज्य समजले जाते. भारतातील समाजवाद समजून घेण्याची पद्धत इतर देशांपेक्षा खूप वेगळी आहे. आपल्या संदर्भात, समाजवादाचा अर्थ प्रामुख्याने कल्याणकारी राज्य असा आहे. यामुळे चांगल्या प्रकारे भरभराट होत असलेले खाजगी क्षेत्र कधीच थांबले नाही. याचा फायदा आम्हा सर्वांना झाला आहे. समाजवाद हा शब्द वेगळ्या संदर्भात वापरला जातो, याचा अर्थ राज्य हे एक कल्याणकारी राज्य आहे आणि ते लोकांच्या कल्याणासाठी उभे राहिले पाहिजे आणि संधींची समानता प्रदान केली पाहिजे.”