• मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
Sunday, March 8, 2026
  • Login
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
No Result
View All Result
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज

महिला दिनानिमित्त श्री संत मुक्ताई मंदिरात महिला मेळावा

by Yes News Marathi
March 8, 2026
in इतर घडामोडी
0
महिला दिनानिमित्त श्री संत मुक्ताई मंदिरात महिला मेळावा
0
SHARES
0
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

सोलापूर : आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त मुक्ताई मंदिर येथे मुक्ताई महिला ग्रुप व आधार योगा ग्रुप यांच्या संयुक्त विद्यमाने महिला मेळावा उत्साहात पार पडला. या मेळाव्यास परिसरातील महिलांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.

मेळाव्याच्या अध्यक्षस्थानी प्रा प्रियंका आराध्ये या होत्या. आपल्या अध्यक्षीय भाषणात त्यांनी महिलांच्या आरोग्याच्या दृष्टीने मार्गदर्शन करताना महिलांच्या जीवनातील विविध टप्प्यांवर होणारे शारीरिक व मानसिक बदल तसेच त्या काळात महिलांनी स्वतःच्या आरोग्याची योग्य काळजी घेणे किती आवश्यक आहे, याबाबत उदाहरणांसह सविस्तर माहिती दिली.

कार्यक्रमाच्या प्रमुख पाहुण्या म्हणून प्रसिद्ध नेत्ररोग तज्ज्ञ डॉ. उमा पवार उपस्थित होत्या. त्यांनी महिलांना मार्गदर्शन करताना डोळ्यांचे आरोग्य, त्यांची योग्य काळजी तसेच आवश्यक उपचार याबाबत महत्त्वपूर्ण माहिती दिली. उपस्थित महिलांचा साधा व उत्साही स्वभाव पाहून त्या विशेष प्रभावित झाल्या.

यावेळी श्रीमती अलका गवळी तसेच वैशाली वाले या प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित होत्या.

मेळाव्याचे विशेष आकर्षण म्हणजे कुटुंबाची जबाबदारी सांभाळत विविध व्यवसायांच्या माध्यमातून कुटुंबाच्या प्रगतीत मोलाची भूमिका बजावणाऱ्या तसेच एकत्रित कुटुंब व्यवस्थेला बळकट करणाऱ्या महिलांचा विशेष सत्कार करण्यात आला. यामध्ये मीरा बाळकृष्ण सावंत, सुनीता ज्ञानेश्वर सिद्धारेड्डी, आकांक्षा अतुल पाटील तसेच संगीता सुरेश खटावकर यांचा सत्कार करण्यात आला.

या कार्यक्रमासाठी आधार योगा ग्रुपच्या पुरुष सदस्यांनीही मोलाचे सहकार्य केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक सौ. अर्चना इंगळे यांनी केले, सूत्रसंचालन स्नेहा बनसोडे यांनी केले तर आभार प्रदर्शन सविता होळकर यांनी केले.

कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी अनिता मस्तूद, प्रतिभा धायगुडे, रंजना अलदर, नीता गिरे, नीता सावंत, अश्विनी बनसोडे, सरोजिनी गडदे, रेखा अलाट, सुनीता कलाल, ज्योती शिंदे तसेच आधार योगा ग्रुपचे भगवान बनसोडे, संजय जगताप, विजय जगताप, शंकर चौगुले, नाना कुरळे, विकास पाटील, शिवाजी जाधव, माधव धायगुडे, सुभाष शिंदे यांनी विशेष परिश्रम घेतले.

Previous Post

TOP 25 । आज त्रिवेणी संगम – रंग जल्लोष- स्त्रीशक्तीचा जल्लोष.. अन् रात्री क्रिकेटचा जल्लोष !

पत्ता:

© YES News Marathi ()

 अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र

 

Development And Support By DK Technos

No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In