येस न्युज नेटवर्क : जनतेने ही निवडणूक हातात घेतली आहे. तर पंतप्रधान मोदींचा करिश्मा आता पुरता उतरलेला आहे. त्यामुळे आम्ही यंदा महाराष्ट्रात 40 च्या पुढे आम्ही जाऊ, तर देशात 300 च्या वर जागा जिंकू. असा विश्वास काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांनी व्यक्त केला आहे. राहुल गांधी यांची यात्रेचा निमित्ताने लोकांनी भरघोस प्रतिसाद दिलाय. इंडिया आघाडीला पूर्ण देशात समर्थन मिळाले आहे. त्यामुळे आज मतदानाच्या शेवटच्या टप्प्यानंतर टीव्ही चॅनेल्सवर प्रसारित होणाऱ्या एक्झिट पोलमध्ये देखील त्याचा परिणाम दिसून येईल, असेही नाना पटोले म्हणाले.
आज जाहीर होणाऱ्या एक्झिट पोलच्या चर्चेत सहभागी न होण्याचा निर्णय काँग्रेसच्या वरिष्ठांनी घेतला आहे. याविषयी बोलताना नाना पटोले म्हणाले की, देशात सध्या परिवर्तनाची लाट आहे. त्यामुळे हाय कमांड योग्य निर्णय घेतील. पक्षातील वरिष्ठांचा आदेश असेल तर एक्झिट पोलला जाणार नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले आहे.