येस न्युज मराठी नेटवर्क : सोलापूर महापालिकेचे आयुक्त पी शिवशंकर यांनी स्वतःच्या प्रतिष्ठेचा मुद्दा करत दीड महिन्यापूर्वी शासनाने पाठविलेले सहाय्यक नगररचना संचालक संजय माने यांना कार्यमुक्त केल्यामुळे महापालिका अधिकारी वर्तुळात आणि नगरसेवकांमध्ये आयुक्तांच्या विरोधात मोठा रोष निर्माण होत आहे. शुक्रवारी सायंकाळी महापौर निवासात महापौर श्रीकांचना यन्नम यांच्या अध्यक्षतेखाली सर्वपक्षीय गटनेत्यांची बैठक झाली त्यावेळी महापालिकेचे आयुक्त पी शिवशंकर आणि ज्या आयुक्तांचे जास्त प्रेम विजय खोराटे या अतिरिक्त आयुक्तांवर आहे त्या दोघांनाही महापालिकेच्या सभागृहात ठराव घेऊन शासनाकडे परत पाठवण्याचा निर्णय घेऊ असं एकमुखी ठरले असल्याचे कळते. यावेळी काँग्रेसचे गटनेते चेतन नरोटे वंचित बहुजन आघाडीचे आनंद चंदनशिवे एम आय ॲम पक्षाचे रियाज खैरादि महापालिकेतील भाजपचे पक्ष नेते श्रीनिवास करली विरोधी पक्ष नेते अमोल शिंदे आदी उपस्थित होते महापालिकेत शासनाने डझनभर अधिकारी दिली आहेत मात्र शहरातील अनेक प्रश्नांकडे या अधिकाऱ्यांचे आणि आयुक्तांचे दुर्लक्ष होत आहे असे अनेक मुद्दे मांडत आयुक्तांच्या विरोधात यावेळी राग व्यक्त करण्यात आला. महापालिकेच्या सभागृहात आयुक्तांच्या विरोधात ठराव मांडून त्यांना शासनाकडे परत पाठवण्याचा निर्णय घेऊ असे यावेळी ठरले.