येस न्युज नेटवर्क : रशिया आणि युक्रेनमध्ये युद्धाचा भडका अजून उडाला नसला तरी त्या वादातून आता ठिणग्या पडायला सुरुवात झाली आहे. युक्रेनवर हल्ला करण्यास रशियाच्या संसदेनं व्ल्वादिमीर पुतीन यांना परवानगी दिली. रशियाच्या या आक्रमक पवित्र्यामुळे आता अमेरिकेनेही आक्रमक भूमिका घेतली आहे. अमेरिकेनं युक्रेनला रशियाविरोधात लष्करी कुमक पुरवण्याचा निर्णय घेतला. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ज्यो बायडेन यांनी ही घोषणा केली. त्याशिवाय अमेरिकेने रशियावर आर्थिक निर्बंधाचीही घोषणा केली.
या देशांनी लागू केले रशियावर आर्थिक निर्बंध
अमेरिका : अमेरिकेने रशियाच्या वित्तसंस्थांवर निर्बंध घातले आहेत. पश्चिमात्य देशांसोबतच्या व्यापारावरही अमेरिकेने बंदी घातली आहे. अमेरिकेने रशियावर 2014 पेक्षाही अधिक निर्बंध लागू करण्याचा इशारा दिला आहे.
ब्रिटन : पाच रशियन बँकांवर ब्रिटनकडून निर्बंध घालण्यात आले आहेत. या आर्थिक निर्बंधांमुळे आर्थिक व्यवहारांवर परिणाम होणार आहे.
जर्मनी : ‘नॉर्ड स्ट्रीम २’ वायुवाहिनी रोखण्याची घोषणा जर्मनीने केली आहे. रशियातून जर्मनीला गॅस पुरवठा करण्यात येतो.
कॅनडा : रशियानं मान्यता दिलेल्या डोन्टेस्क, लुहान्स्क प्रांतांशी व्यवहार करण्यास कॅनडा सरकारने मनाई केली आहे. या प्रांतांना मान्यता देणाऱ्या रशियन खासदारांवर बंदी घालण्यात आली आहे.