महापालिका आणि जिल्हा परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी मुंबईत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्याबरोबर अपयशाबाबत चिंतन केले. काँग्रेस संघटन वाढविण्यासंदर्भात यावेळी विचार विनिमय करण्यात आला. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्ष यांच्यासोबत आगामी काळात निवडणूक न लढवणे योग्य की अयोग्य या महत्त्वाच्या विषयावर या बैठकीत चर्चा झाली. महापालिका निवडणुकीतील निकालाबाबत राहुल गांधी यांनी नाराजी व्यक्त केली. एकूणच काँग्रेसचा ढासळचा आलेख पाहता काँग्रेस भविष्यात ठाकरे सेना आणि शरद पवार यांची साथ सोडण्याचा विचार करीत असल्याचे दिसून येत आहे.

