सोलापूर – शहरातील प्रमुख चौक छत्रपती संभाजी महाराज पुतळ्यापासून छत्रपती शिवाजी महाराज पुतळा पर्यंत या रस्त्याला प्रचंड खड्डे पडल्यामुळे नागरिकांचे हाल होत आहेत. या परिसरातील नगरसेवक आनंद चंदनशिवे यांनी प्रत्यक्षात आज या भागाची पाहणी केली. पाहणी करत असताना हॉटेल आंबेसीटर या ठिकाणी पाण्याची लाईन फुटल्यामुळे प्रभाकर महाराज मंदिराकडे जाणारा रस्ता बंद झाला आहे. या भागामध्ये वाहतुकीचे प्रचंड रहदारी असून या भागाकडे वारंवार मनपा अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष पणामुळे नागरिकांचे हाल होत आहेत. या पाहणी प्रसंगी गटनेते आनंद चंदनशिवे यांनी येणाऱ्या दोन चार दिवसांमध्ये खड्डे न बुजवल्यास आंदोलन करू असा इशारा गटनेते आनंद चंदनशिवे यांनी दिला आहे.या पाहणीच्या वेळी विजय बमगोंडे अविनाश भडकुंबे आदी उपस्थित होते.
