महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेतर्फे 23 नोव्हेंबर 2025 रोजी घेण्यात आलेल्या शिक्षक पात्रता परीक्षेचा अंतरिम निकाल 16 जानेवारीला जाहीर करण्यात आला. त्यामध्ये 82 गुण मिळवलेल्या विद्यार्थ्यांनाही अपात्र केले आहे. यापूर्वी 82 गुणांना पात्र असताना आत्ताच 83 गुणांचा निकष का? असा संतप्त सवाल विद्यार्थ्यांनी उपस्थित केला आहे. आजपर्यंत राखीव प्रवर्गातील पात्रतेचा निकष 82 गुणांना होता. केंद्राच्या शिक्षक पात्रता परिषदेमध्येही 82 गुणांनाच पात्र केले जाते. राज्य परीक्षा परिषदेने यंदा 82 गुण मिळवलेल्या विद्यार्थ्यांनाही अपात्र केले आहे. यासंदर्भात राज्य परीक्षा परिषदेचे अध्यक्ष आणि आयुक्त यांनी कोणताही प्रतिसाद दिलेला नाही.

