चला उत्तर जानुन घेवुयात.
उत्तर – हिंदु धर्म संस्कृती तसेच पुराणांचा संदर्भ घेता हे लक्षात येते की सुर्य हा रोज क्षय पावतो व दुसर्या दिवशी परत तेज धारण करत उगवतो….परंतु चंद्र मात्र कले कलेने क्षय पावतो . याचे सर्वाधीक तेज हे पौर्णिमेस असते. यास इंग्रजीत ‘फुल मुन’ म्हटले जाते. चंद्र हा पाण्याला विचलित करतो .त्यामुळेच समुद्राला भरती येते. याच पौर्णिमेस समुद्र जास्त खवळलेला तसेच उग्र दिसतो. हे त्याच्या शक्ती रूपाचे दर्शन होय . मानवाच्या शरीरात सुद्धा 90-95 % पाणी आहे. हे सुद्धा चंद्राच्या प्रभावाने विचलित होते. व हे शरीर सुद्धा उग्र स्वरूपात येते , या पौर्णिमेच्या दिवशी माणसाचे मन देखील जास्त विचारी तसेच उग्र विचारांचे होते. कारण चंद्रस ‘मन का कारक’ संबोधले जाते.
ही देवी ही शक्ती स्वरूपा असल्याने शक्ती ज्या वेळेस उग्र स्वरूपात असते त्या वेळेस शक्ती उत्सव साजरा केला जातो. व बेभान होऊन वाद्यासह देवी समोर नृत्य केले जाते.
कोजागिरी पोर्णिमा हा दिवस शरद पोर्णिमा म्हणजेच शेतकऱ्यांची कापणी पुर्ण झाल्यावर येतो व या कोजागिरी पौर्णिमेस चंद्र हा पृथ्वीच्या अगदी जवळ तसेच या वेळेस याला ‘सुपर फुल मुन’ असेही म्हणतात . या मुळे हा चंद्र जास्त प्रभाव दाखवतो . व याच पोर्णिमेस शक्ती सर्वाधीक असते त्यामुळेच कोजागिरीस सणाचा दर्जा मिळतो. व तुळजापूर मध्ये हा दिवस मोठ्या उत्साहात पार पडतो. बाकीची माहीती सर्वाना माहीतीच आहे कसा आपल्या येथे हा उत्सव साजरा केला जातो.