येस न्युज नेटवर्क : लोकसभेत राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरील चर्चेदरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काँग्रेसवर सडकून टीका केली. यानंतर आता काँग्रेसकडून भाजपावर पलटवार केला जात आहे. ओबीसी समाजासंदर्भात पंतप्रधान मोदी यांनी काँग्रेसवर केलेल्या टीकेला खासदार राहुल गांधी यांनी प्रत्युत्तर दिले. तप्रधान मोदी जातिनिहाय जनगणना करण्यास का घाबरतात, असा सवालही राहुल गांधी यांनी केला आहे.
काँग्रेस पक्ष आणि यूपीए सरकारने ओबीसींना न्याय दिला नाही. ओबीसी समाजावर अन्याय केला. काही दिवसांपूर्वी कर्पूरी ठाकूर यांना भारतरत्न प्रदान करण्यात आला. त्यांचा आम्ही सन्मान केला. सन १९७० मध्ये जेव्हा ते मुख्यमंत्री झाले, तेव्हा त्यांच्या सरकारला अस्थिर करण्यासाठी अनेक गोष्टी केल्या गेल्या. त्यांना विरोधी पक्षनेता म्हणून स्वीकारण्यास नकार दिला. ज्या संविधानासाठी कर्पूरी ठाकूर यांनी जीवन व्यक्तीत केले, त्याग केला, त्यांचा अपमान काँग्रेसने केला. ओबीसीसाठी भाजपाने काय केले, असा प्रश्न विचारतात, पण पंतप्रधानपदी असलेली ओबीसी व्यक्ती दिसत नाही का, यापेक्षा आणखी कोणते मोठे उदाहरण द्यायचे, असे सांगत पंतप्रधान मोदी यांनी टीका केली होती. यावर राहुल गांधींनी पलटवार केला.