येस न्युज मराठी नेटवर्क ; मागच्या आठवड्यात महाराष्ट्रात दर दिवशी तीन हजारपेक्षा जास्त नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. फेब्रुवारीच्या पहिल्या आठवडयापेक्षा दुसऱ्या आठवडयात १४ टक्के जास्त रुग्णवाढ दिसून आली. ८ ते १४ फेब्रुवारी दरम्यान २०,२०७ नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली. तेच एक ते सात फेब्रुवारी दरम्यान कोरोना रुग्णांची संख्या १७,६७२ होती. २५ ते ३१ जानेवारी दरम्यान १७,२९३ करोना रुग्णांची नोंद झाली. फेब्रुवारीच्या दुसऱ्या आठवड्यात पुणे, मुंबई, नागपूर, ठाणे आणि अमरावती भागातून ६० टक्के नव्या करोना रुग्णांची नोंद झाली आहे.ग्राम पंचायत निवडणुकांमुळे ग्रामीण भागात रुग्णवाढ झालेली असू शकते. विदर्भ आणि मराठवाड्यातील काही भागात ग्राम पंचायत निवडणुकीत ८० टक्क्यांपेक्षा जास्त मतदान झाले. त्यामुळे करोनाचा फैलाव झालेला असू शकतो. मागच्यावर्षी करोनामुळे लग्नसोहळे आणि अन्य कार्यक्रम पुढे ढकलण्यात आले होते. पण आता पुन्हा हे सोहळे सुरु झाले आहेत. त्यामुळे सुद्धा करोनाचा फैलाव होऊ शकतो. त्यामुळेच अशा कार्यक्रमातील गर्दीवर मर्यादा आणणे आवश्यक असल्याच्या मुद्याकडे आवटे यांनी लक्ष वेधले.लग्न समारंभाला ४००-५०० लोकांची उपस्थिती असते. पण आता ५० पेक्षा जास्त पाहुण्यांना हजर राहता येणार नाही. या नियमाची कठोर अमलबजावणी केली जाईल. त्याशिवाय लोकांना लग्न समारंभात मास्क घालणे बंधनकारक असेल.