सत्ताधारी दबावाचे राजकारण करत आहेत, त्यांच्या विरोधात बोलणे गरजेचे
सोलापुर दिनांक :- सोलापुर शहर काँग्रेस कमिटीच्या वतीने राष्ट्रीय पत्रकार दिन आणि आद्य पत्रकार दर्पणकार आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या जयंतीनिमित काँग्रेस भवन येथे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी कार्याध्यक्षा आमदार प्रणिती शिंदे यांच्या हस्ते शहर अध्यक्ष चेतनभाऊ नरोटे यांच्या उपस्थितीत पत्रकार बांधवांचा सत्कार करण्यात आला.
यावेळी आमदार प्रणिती शिंदे यांनी राष्ट्रीय पत्रकार दिनांच्या प्रथम सर्व पत्रकारांना शुभेच्छा दिल्या. पुढे बोलताना म्हणाले की पूर्वीच्या काळी लोक आणि पत्रकार खुलेपनाने आपले मत व्यक्त करत होते. पण आज सत्ताधाऱ्यांकडून लोकांवर, विरोधकांवर पत्रकारांवर दबाव टाकले जात आहे. बोलू आणि लिहू दिले जात नाही अनेक नामवंत पत्रकार सरकारच्या दबावामुळे राजीनामा देत आहेत आणिबाणी सारखे परिस्थिती निर्माण झाली आहे. दबावाखाली बातम्या दिल्या जात आहेत. सोशल मिडियावर विरोधकांना ट्रोल केले जात आहे. ईडी, सीबीआय संविधानिक संस्थांचा गैरवापर करून लोकशाहिचा गळा दाबण्याचा प्रयत्न सुरु आहे. उम्मीद पे दुनिया कायम म्हणी सारखे पत्रकारांमुळेच एक आशेचा किरण दिसतो सत्य, आणि वस्तुस्थिती आणि विरोधकांचा आवाज जनतेपर्यंत पोहोचविण्याचे आव्हान पत्रकारांसमोर आहे. सत्ताधारी दबावाचे राजकारण करत आहेत त्यांच्या विरोधात बोलणे गरजेचे आहे, पत्रकारांमुळेच लोकशाही मजबूत असून सत्ताधाऱ्यांचे डोळे उघडण्याचे काम पत्रकारांनी करावे. पत्रकार बांधव अनेक अडचणीतुन सत्य लोकांपर्यंत पोहोचविण्याचे काम करत असतात आपले कोणतेही अडचण असू दया मी नक्कीच सहकार्य करण्याचा प्रयत्न करणार असल्याचे सांगितले.
या कार्यक्रमास महिला अध्यक्षा हेमाताई चिंचोळकर, मा. विनोद भोसले, प्रवीण निकाळजे, देवीदास गायकवाड, केशव इंगळे, अंबादास गुत्तिकोंडा, अंबादास करगुळे, हसीब नदाफ, VD गायकवाड़, हारून शेख, तिरुपती परकीपंडला, सायमन गट्टू, दाऊद नदाफ, नूर अहमद नालवार, प्रवीण जाधव, अनिल जाधव, शोभा बोबे, चंदा काळे, संघमित्रा चौधरी, लता गुंडला, मुमताज तांबोळी, अनिता भालेराव, संतोषी गुंडे, मीना गायकवाड, यांच्यासह पत्रकार बांधव व इतर मान्यवर उपस्थित होते.या कार्यक्रमाचे प्रस्ताविक चेतनभाऊ नरोटे यांनी सूत्रसंचालन केशव इंगळे तर आभार प्रदर्शन तिरुपती परकीपंडला यांनी केले.