सोलापूर : विजय कुरापाटी आणि त्याचा मित्र आमच्या जीवावर उड्या मारतो आणि माझ्या बहिणीशी का बोलत असतोस ? अशी विचारणा करून मारहाण केल्याची घटना सोलापुरात घडली आहे. आकाश गोडे याने रस्त्यावर पडलेला दगड घेऊन विजय कुरापाटी याच्या डोक्यावर मारला . स्वप्नील देडे याने त्याच्या हातातील लाकडी दांडूने विजय कुरापाटी उजव्या हाताच्या अंगठ्याला व पंजावर मारून जखमी केले .आकाश व स्वप्नील लोंढे या दोघांनी आपल्याला खल्लास करण्याची धमकी दिली . त्याचप्रमाणे मोटरसायकलला दगड मारून दहा हजार रुपयांचे नुकसान केल्याची तक्रार विजय कुरापाटी यांनी एमआयडीसी पोलिस ठाण्यात केली आहे. याप्रकरणी पोलीस सबइन्स्पेक्टर वाडीवाले अधिक तपास करीत आहेत.