खरी शिवसेना कुणाची यावर आज (ता. 17) केंद्रीय निवडणूक आयोगात सुनावणी पार पडली. आज ठाकरे गटाच्या वतीने ज्येष्ठ वकील कपिल सिब्बल यांनी बाजू मांडली. त्यानंतर आता शिंदे गटाचे वकील महेश जेठमलानी युक्तीवाद केला. त्यावर पुन्हा सिब्बल यांनी बाजू मांडली. आता निवडणूक आयोगात पुढील सुनावणी शुक्रवारी 20 जानेवारीला होणार आहे.
- कपिल सिब्बल यांनी बाजू माडतांना म्हटले होते, ”त्यांनी शिवसेनेतील संघटनात्मक निवडणुकीसाठी परवानगी द्यावी, अशी मागणी आयोगाकडे केली आहे. शिवसेनेतील हा फुटीर गट नाही. शिंदे गटाला काही अर्थ नाही. खरी शिवसेना उद्धव ठाकरे गटाचीच आहे. शिवसेनेत फूट हे कपोकल्पीत काल्पनिक बाब असल्याचे सिब्बल म्हणाले. शिंदे गट हे वास्तव नाही, शिवसेनेच्या घटनेचे आयोगात वाचन करण्यात आले. फूटलेल्या आमदारांनी स्वतःहून पक्ष सोडला,” असल्याचे सिब्बल यांनी स्पष्ट केले.
- शिंदे गटाच्या कागदपत्रांमध्ये अनेक त्रूटी आहेत. शिंदे गटाच्या याचीकेमध्ये अनेक त्रूटी आहेत, शिंदे गटाचे बंड पक्षाच्या या अवस्थेवर परिणाम करणारे नाही. चिन्हावर निवडणूक आयोगाने निर्णय देण्याची घाई करु नये, असेही सिब्बल यांनी म्हटले आहे. शिंदे गटाचे मुद्दे ठाकरे गटाने खोडून काढले. शिंदे गटाने सादर केलेली कागदपत्रे खोटी असल्याचा सिब्बल यांनी दावा केला असून धनुष्यबाण चिन्हाचा निर्णय आताच घेऊ नये. काही लोकांना पक्षातून घेऊन बाहेर पडणे हे बेकायदेशीर, असल्याचेही सिब्बल म्हणाले आहेत. निवडणूक आयोगाने सर्व बाजू तपासाव्या. सर्व कागदपत्रांची छाननी करावी, असा युक्तीवाद सिब्बल यांच्या बाजूने सुरु आहे.
- ठाकरे गटाच्या वतीने खासदार अनिल देसाई उपस्थित आहेत. तर शिंदे गटाच्या वतीने खासदार राहुल शेवाळेही उपस्थित आहेत. शिवसेनेतील फूट ही फक्त कल्पना आहे, असेही सिब्बल यांनी स्पष्ट केले आहे.
- निवडणूक आयोगापुढे आता ठाकरे गटाच्या युक्तीवादानंतर शिंदे गटाचा प्रतिवाद सुरू झाला आहे. वकील महेश जेठमलानी शिंदे गटाची बाजू मांडत आहेत. ‘आयोगाने धनुष्यबाण चिन्ह व शिवसेना नावाबाबत लवकरात लवकर निर्णय द्यावा, अशी मागणी शिंदे गटाकडून करण्यात आली. आमच्याकडे संख्याबळ आहे. आमदार, खासदारांचे बहुमत जास्त असल्याने पक्षचिन्हाचा निर्णय लवकर घ्या, अशी मागणी जेठमलानी यांनी केली आहे. तसेच लोकप्रतिनिधींसह एक मोठा गट पक्षातून बाहेर पडला तर तो बेकायदेशीर कसा, असा सवाल त्यांनी उपस्थित केला. शिंदे गटाच्या कागदपत्रात त्रूटी नाहीत, ठाकरे गटाचा आरोप चुकीचा असे जेठमलानी यांनी म्हटले आहे. मोठ्या संख्येने पक्षातून लोकप्रतिनिधी बाहेर पडतात, यात तथ्य आहे.’ असे त्यांनी स्पष्ट केले.
- शिंदे गटाची कागदपत्रे खरी असतील तर ओळख परेड करा, असे सिब्बल म्हणाले आहे. आम्ही लाखो कागदपत्रे सादर केली आहेत. त्यामुळे पक्षावर आमचे वर्चस्व आहे. आयोगाने कागदपत्रांची छाननी करावी, आम्ही ती करायला तयार आहोत. असे सांगितले तसेच आता पुढील सुनावणी शुक्रवारी २० जानेवारी रोजी होणार आहे. सिब्बल यांनी सांगितले की मला पुन्हा दोन ते तीन तास युक्तीवाद करायचा आहे.