सोलापूर : सोलापूरच्या लोकसभेची जागा राष्ट्रवादीला द्यावी या मागणीसाठी सध्या राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी सर्वप्रथम ही मागणी केली त्यानंतर या चर्चेला सुरुवात झाली. दरम्यान लोकसभेची जागा राष्ट्रवादी मागत असल्याने काँग्रेसमध्ये संतापाचे वातावरण आहे.
याच पार्श्वभूमीवर प्रसारमाध्यमांनी काँग्रेसच्या तीन टर्म आमदार प्रणिती शिंदे यांची या प्रकरणात प्रतिक्रिया विचारली असता त्यांनी रोखठोक उत्तर देताना थेट कोण रोहित पवार? असा सवाल माध्यमांसमोर केला. त्यांची आमदारकीची पहिली टर्म आहे, त्यामुळे पोरकटपणा असतो काही जणांच्यामध्ये असे म्हणून त्यांनी पवारांच्या मागणीकडे दुर्लक्ष केले.