येस न्युज मराठी नेटवर्क : भाजी खरेदी करताना धक्का मारून खिशातील मोबाईल चोरून नेल्याची फिर्याद राहुल अक्कलकोटे यांनी जेलरोड पोलिस ठाण्यात केली आहे. २१ मे रोजी सकाळी साडेदहाच्या सुमारास मार्केट यार्ड येथील लोखंडवाला कॉम्प्लेक्सच्या बाजूस चाकोते प्रशालेसमोर भाजी खरेदी करत असताना हा प्रकार घडल्याचे अक्कलकोटे यांनी फिर्यादीत म्हटले आहे. पोलीस नाईक गवळी अधिक तपास करीत आहेत.