No Result
View All Result
- सोलापूर : मुरूम उत्खननातील जप्त केलेला जेसीबी परत देण्यासाठी व कोणताही गुन्हा दाखल न करण्यासाठी एक लाखाची लाच घेणाऱ्या पंढरपूरच्या मंडलाधिकाऱ्यासह एका खाजगी इसमाला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ पकडले आहे.
- रणजीत मारुती मोरे (वय ३७) पद- मंडळ अधिकारी, तहसिल पंढरपूर, रा. औदुंबर नगर, ता. पंढरपूर जि. सोलापूर २) शरद रामचंद्र मोरे (वय ३७, व्यवसाय शेती) रा. तुंगत ता. पंढरपूर जि. सोलापूर यांना रंगेहाथ पकडण्यात आले आहे.
- आरोपी लोकसेवक व आरोपी खाजगी इसम यांनी मुरुम उत्खननाबाबत तक्रारदार यांनी भाडे तत्वावर घेतलेला जेसीबी दि. १५.०१.२०२३ रोजी ताब्यात घेवून तक्रारदार यांच्या टीपर ट्रकमधुन चोरीच्या मुरुमची वाहतुक झाली असल्याबाबत सांगुन त्यावरुन तक्रारदार यांच्यावर कोणताही गुन्हा दाखल न करण्यासाठी अथवा कोणताही दंड न आकारता ताब्यात असलेला जेसीबी सोडण्यासाठी १ लाख रुपये लाचेची मागणी करुन सदर लाच रक्कम स्विकारली असता नमुद आरोपींना रंगेहाथ पकडण्यात आले आहे.
- ही कारवाई उमाकांत महाडिक, पोलीस निरीक्षक एसीबी. सोलापूर. पोलीस अंमलदार सोनवणे, पो. नि. प्रमोद पकाले, अतुल घाडगे, पोकों स्वप्नील सन्नके, व चालक शाम सुरवसे यांनी यशस्वीरित्या पार पाडली आहे.
No Result
View All Result