आज ८४ व्या जयंती पासून १०१ लाभार्थ्यांना दिले जाणार लाभ
सोलापूर : स्व.विष्णूपंत तात्या कोठे यांच्या जयंतीनिमित्त नगरसेवक देवेंद्र कोठे यांच्या संकल्पनेतून निराधार, अपंग, बेघर लोकांना दररोज दोन वेळचा पोटभर स्वादिष्ट जेवणाचा घरपोच मोफत डबा देण्यास सुरूवात करण्यात आला. कालपर्यंत ८१ निराधार, गरजवंत लाभार्थी लाभ घेत होते. सोलापूर महानगरपालिकेचे नगरसेवक आनंद दादा चंदनशिवे, नगरसेवक विठ्ठल कोठा,नगरसेवक गणेश पुजारी यांच्या हस्ते नव्याने २० लाभार्थ्यांना डब्यांचे वितरण करण्यात आले मान्यवरांच्या हस्ते अन्नपूर्णा देवी,सरस्वती मातेची व स्वर्गीय तात्यासाहेब कोठे, राजेश आण्णा कोठे यांचे प्रतिमेचे पूजन करण्यात आले.
नगरसेवक आनंद दादा चंदनशिवे यांनी मनोगतामध्ये आत्मतृप्ती योजनेचा या कार्याबद्दल गौरव केला तसेच योजना यशस्वी करण्यासाठी कार्यरत असणारे संस्थेचे सर्व स्वयंपाकी व वितरण करणाऱ्या कर्मचाऱ्यांचे त्यांनी अभिनंदन करून पुढील कार्यासाठी त्यांनी शुभेच्छा दिल्या. या कार्यक्रमाला संस्था अध्यक्ष देवेंद्र कोठे, श्रीनिवास बोद्धूल, रमेश यन्नम,निर्मलकुमार काकडे, रोहिणी सुरा, मोनिका कोठे, मुख्याध्यापिका पुष्पा नायर, परिवहन सदस्य परशुराम भिसे उपस्थित होते.
मागील दोन वर्षा पासून नगरसेवक देवेंद्र कोठे हे आपल्या वाढदिवसानिमित्त आपल्या हितचिंतकांना हार,पुष्पगुच्छ,भेट वस्तू,जाहिराती इत्यादीं खर्चा ऐवजी मूठभर धान्य या योजनेसाठी द्यावे म्हणून आवाहन करत असतात. सर्व मित्र परिवाराकडून व याला प्रचंड प्रतिसाद मिळत आलेला आहे. मागील वर्षी कोरोनाच्या संकट काळात नगरसेवक देवेंद्र दादा परगावी असतानासुद्धा साधारण सव्वा दोन लाख रुपयांची मदत (रोख रक्कम व धान्य) संस्थेस मिळाली आहे. आपण समाजाचं देणं लागतो आपण समाजासाठी काम केलं पाहिजे हीच स्वर्गीय तात्यासाहेबांची शिकवण होती.या भावनेतून देवेंद्र दादांनी आपल्या वाढदिवसाला ०८.०९.२०२० रोजी जितकी मदत लोकांच्या मार्फत संस्थेला मिळाली होती .तितकीच रक्कम २५१००० रुपये देणगी आज चि. श्रीविष्णूराजच्या वाढदिवसानिमित्त आत्मतृप्ती योजनेत जमा केलेत.
देणारा समाज आहे व घेणारा ही समाज आहे आपल्याला दोघांच्या मधील दुवा बनून लोकांसाठी सामाजिक कार्य करायचा आहे याच भावनेतून विष्णूपंत कोठे आत्मतृप्ती योजना सुरू झालेली आहे आणि ही योजना यशस्वी होण्यासाठी संस्थेचे स्वयंपाकी असणारे सर्व मावशी व वितरण करणारे सर्व मामा हे ऊन,पाऊस वारा असो की कोरोनासारख्या महाभयंकर आजारातील संकट अशा परिस्थितीत सुद्धा ही योजना ३६५ दिवस अखंडित सुरू ठेवली आहे.