येस न्युज मराठी नेटवर्क : WhatsApp ची सेवा दोन तासांनंतर पूर्वपदावर आली आहे. भारतातील अनेक शहरात साडे बारा वाजता WhatsApp ची सेवा डाउन झाली होती. अनेक यूजर्सला मेसेज पाठवण्यात तसेच मेसेज येण्यात अडचण येत होती. परंतु, मेटा कंपनीने ही सेवा पूर्वपदावर केली असून मेसेज आता पाठवता येवू शकतात. तसेच कम्प्यूटर व लॅपटॉपवर व्हॉट्सअॅप वेब सुद्धा कनेक्ट होत आहे.
WhatsApp चा वापर करता येत नसल्याने अनेक जण त्रस्त झाले होते. अनेकांचे कोणतेही मेसेज जात नव्हते. WhatsApp चे हजारो, लाखो यूजर्सचे WhatsApp काम करीत नव्हते त्यामुळे अनेकांनी आपल्या समस्या ट्विटर, फेसबुक यासारख्या सोशल मीडियावरून मांडल्या होत्या. वेबसाइटच्या मॅपच्या आधारानुसार, मुंबई, दिल्ली, कोलकाता, आणि लखनऊ सारख्या प्रमुख शहरात यूजर्संना फटका जास बसला आहे.