येस न्युज मराठी नेटवर्क : प्रजासत्ताक दिनाच्या पार्श्वभूमीवर दिल्लीत शेतकऱ्यांनी सुरू केलेल्या ट्रॅक्टर रॅलीला हिंसक वळण लागलं. या रॅली दरम्यान पोलीस आणि शेतकरी आमने सामने आले आहेत. शेतकरी आंदोलक आक्रमक झाले असून लाल किल्ल्यावर त्यांनी प्रवेश केला आहे. तसेच किल्ल्यासमोर या आंदोलकांनी शेतकरी संघटनेचा झेंडा फडकावला. यावेळी शेतकऱ्यांनी पोलिसांवर दगडफेक केल्याने पोलिसांना लाठीचार्ज करावा लागला. त्यामुळे जमावाला पांगवण्यासाठी पोलिसांना अश्रूधुराच्या नळकांड्या फोडाव्या लागल्या असून त्यामुळे या परिसरात तणाव निर्माण झाला आहे.
दरम्यान या सर्व परिस्थितीच्या पार्शवभूमीवर इंटरनेट, मेट्रो बंद असून इंडिया गेटकडे जाणारे सर्व मार्ग जामा मशीद, मेट्रो, राष्ट्रपती भवन, पंतप्रधानांच्या घराबाहेर बाहेर कडेकोट सुरक्षा वाढवली आहे. दिल्लीतील ट्रॅक्टर परेडदरम्यान ज्या भागात हिंसाचार घडला तिथल्या काही भागात इंटरनेट सेवा स्थगित करण्यात आली आहे.