येस न्युज नेटवर्क : पुणे जिल्ह्यात उभारलेल्या लवासा हिल स्टेशनविरोधात दाखल केलेल्या याचिकेवर मुंबई उच्च न्यायालय आज निर्णय देणार आहे. पर्यावरण संवर्धनाच्या नियमांचं उल्लंघन करून आणि विविध विभागांकडून बेकायदा परवानग्या घेऊन हा प्रकल्प उभारण्यात आल्याचा आरोप याचिकाकर्त्यांनी केला होता. त्यामुळे तो रद्द करून लिलावाच्या प्रक्रियेला स्थगिती देण्याची मागणी याचिकाकर्त्यांनी न्यायालयात केली आहे. शरद पवार यांच्या निकटवर्तीयांचा हा प्रकल्प असल्यानं त्यांच्यावर मेहेरनजर करण्यात आल्याचा आरोप याचिकाकर्त्यांनी केला होता. त्यामुळे या प्रकरणात न्यायालय काय निर्णय देणार याकडे राज्याचं लक्ष लागलं आहे.
पर्यावरण संवर्धनाच्या नियमांचे उल्लंघन करून तसेच राज्य सरकारच्या विविध विभागांकडून बेकायदेशीर परवानग्या घेऊन उभारण्यात आलेला लवासा प्रकल्प बेकायदा ठरवत, तो रद्द करावा. तसेच त्याच्या लिलावाच्या प्रक्रियेला स्थगिती द्या, अशी विनंती करणारी जनहित याचिका उच्च न्यायालयात दाखल करण्यात आली आहे. या याचिकेवर आज मुंबई उच्च न्यायालय आपला निर्णय देणार आहे.