सोलापूर : राज्य सरकारने मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना ही निवडणुकीपूर्वी घोषणा केली होती त्यानंतर ही योजना अस्तित्वात आली असंख्य युवक युवतींना मोठ्या प्रमाणात या योजनेचा फायदा झाला राज्यातील एक लाख 84 हजार इतके युवक कार्य प्रशिक्षणार्थी प्रशिक्षण घेत आहेत वारंवार राज्य सरकारचे मंत्री अश्वासित करतात की तुम्ही जिथे प्रशिक्षण घेतले. तिथे शंभर टक्के रोजगार देणार अशा पद्धतीच्या बातम्या स्टेटमेंट करत आहेत. त्याचाच एक भाग म्हणून सोलापूर शहर जिल्ह्यातील मुख्य मंत्री युवा कार्य प्रशिक्षणार्थी यांच्या वतीने राज्य सरकारचे लक्ष वेधण्यासाठी विविध मागणी घेऊन आज जिल्हा परिषद समोरून गेट येथे आंदोलन करण्यात आले.

या आंदोलनाच्या माध्यमातून प्रमुख मागण्या असे आहेत की मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षणार्थीचा ११ महिन्याचा कालावधी पूर्ण झाल्यानंतर अस्थापनेवर असलेल्या युवा प्रशिक्षणार्थीना पुढे शासकीय सेवेत घेण्यात यावे.राज्य सरकारने राज्यातील विविध अस्थापनेस युवा कार्य प्रशिक्षणार्थीना सामावून घेण्याबाबत आदेश जारी करावे.सदरील युवा कार्य प्रशिक्षणार्थीना विविध अस्थापनेत असलेल्या रिक्त जागे पैकी १० टक्के जागा भरण्यात यावे.मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षणार्थीना देण्यात आलेले प्रमाणपत्र हे शासकिय/निमशासकीय सेवेत ग्राहय धरुन आहे त्या अस्थापनेत रोजगार देण्यात यावा.

या मागण्याचे लक्ष वेधण्यासाठी सध्या चालू असलेल्या अधिवेशनात तात्काळ राज्याचे मुख्यमंत्री व दोन उपमुख्यमंत्री तसेच विभागाचे मंत्री यांनी सकारात्मक निर्णय घेऊन प्रशिक्षणार्थींच्या बाबतीत सकारात्मक निर्णय घेण्याबाबत संबंधितांना आदेश द्यावे तसेच तात्काळ परिपत्रक जारी जिथे प्रशिक्षणार्थी प्रशिक्षण घेत आहेत त्याच आस्थापन विभागात कायमस्वरूपी रोजगार देण्याबाबत शासन निर्णय व्हावा हे आंदोलन यशस्वी करण्यासाठी मोठ्या प्रमाणात शहर जिल्ह्यातील मुख्यमंत्री युवा कार्यप्रशिक्षणार्थ उपस्थित होते.