येस न्युज मराठी नेटवर्क : नाना पटोले यांनी विधानसभा अध्यक्षपदाचा राजीनामा दिल्यामुळं या जागेसाठी पुन्हा निवडणूक होणार आहे. त्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पक्ष पुन्हा सक्रिय झाला असून ‘आम्ही फासे पलटवणार’ असं सूचक वक्तव्य विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केलं आहे. फडणवीस यांनी केलेल्या वक्तव्याकडं पत्रकारांनी राऊत यांचं लक्ष वेधलं. त्यावर, ‘फडणवीसांना त्यासाठी माझ्या मनापासून शुभेच्छा आहेत,’ असं संजय राऊत म्हणाले. ‘सामना’च्या आजच्या अग्रलेखात काँग्रेसमधील फेरबदलाचे विश्लेषण करताना शिवसेनेनं बाळासाहेब थोरात यांचं कौतुक केलं आहे.
तसंच, नाना पटोले हे भाजपमध्ये जाऊन आले आहेत याकडंही लक्ष वेधलं आहे. ही टीका आहे का असं विचारलं असता राऊत यांनी नकारार्थी उत्तर दिलं.विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक पुन्हा घ्यावी लागणार असल्यानं मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री नाराज आहेत का, यावर प्रश्नावर राऊत यांनी सावध उत्तर दिलं.