येस न्युज नेटवर्क : देवळा, नाशिकच्या धाराशिव साखर कारखाना युनिट२ च्या ❝बाॅयलर अग्निप्रदिपन व गळीत हंगामाचा शुभारंभ❞ आज झाला. बाॅयलरला अग्नि देऊन, काटा पुजन केले. ऊस भरून आलेल्या वाहनांचे पुजन करून,गव्हाणीत मान्यवरांच्या व प्रगतशील शेतकऱ्यांच्या हस्ते मोळी टाकण्यात आली. बागलाणाचे आमदार श्री.दिलीप बोरसेसाहेब, कळवण- सुरगाणाचे आमदार श्री.नितीन पवारसाहेब, महाराष्ट्र राज्य सह.बँकचे मा. सदस्य अविनाश महागांवकरसाहेब,देवळा- चांदवडचे आमदार डाॅ. राहूल आहेरसाहेब, आवसायक राजेंद्र देशमुख, शेतकरी बांधव आदी उपस्थित होते.
गतवर्षी पाऊस मोठ्या प्रमाणात झाल्याने शेतकऱ्यांत आनंदाच वातावरण आहे. या वर्षीदोन हजार हेक्टर कारखान्यास ऊसाची नोंद आली आहे. ट्रॅक्टर व ट्रकचे ३५०करार करून हाफ्ता ही देण्यात आला आहे. येत्या दिवसांत भागात टोळ्या टाकून ऊस आणला जाईल. कारखाना पुर्ण क्षमतेने चालवून चांगल्या प्रमाणात गाळप करण्याचा मानस आहे. कारखाना सुरू झाल्याने शेतकऱ्यांनी ऊस लागवड करताना १०००१, ८००५ ऊसाची जास्तीत जास्त लागवड करावी. जेणेकरून आपला ऊस लवकर कारखान्यास लवकर गाळपास आणता येईल. असे अभिजीत पाटील यांनी सांगितले.
यावेळी कारखान्याचे चेअरमन अभिजीत पाटील, कार्यकारी संचालक अमर पाटील, संचालक सुरेशतात्या सावंत, संतोष कांबळे, सजंय खरात, संदीप खारे, विकास काळे, तसेच रविराजे देशमुख, सत्यजित फडे,सुरज पाटील, गौरव दोशी,भागातील पदाधिकारी मंडळी व कारखान्यातील सर्व खाते प्रमुख अधिकारी, कर्मचारी, ऊस उत्पादक शेतकरी, वाहन ठेकेदार उपस्थित होते.