मुंबई : 57 लाख कुणबी दाखले घेऊन मराठा समाज ओबीसीमध्ये घुसला आहे, हे स्वतः मनोज जरांगे बोलत आहेत. तरीदेखील सरकार काही बोलत नाही. म्हणून आता आम्ही विधानसभा निवडणूक लढण्याचा निर्णय घेतला आहे. विधानसभेच्या सर्वच्या सर्व म्हणजे 288 जागा लढण्याचा आम्ही निर्णय घेतल्याची माहिती ओबीसी नेते प्रकाश शेंडगे यांनी दिली आहे. लोसंख्येच्या प्रमाणत तिकीट दिलं जाईल असंही ते म्हणाले.
मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण नको अशी भुमिका कुणीच घेतं नाही. म्हणून आम्ही आता निवडणूक लढण्याचा निर्णय घेतला आहे. कारण राज्यात ओबीसी विरुद्ध मराठा अशीच निवडणूक पार पडणार असल्याचे शेंडगे म्हणाले. लोकसभा निवडणुकीत प्रकाश अंबेडकर यांनी आमच्यासोबत प्रचारसभा घेतल्या आणि ऐन निवडणुकीत वेगळी भूमीका घेतली. कारण सुरुवातीला आम्हाला पाठिंबा दिला आणि ऐनवेळी धंनदांडग्यांना प्रकाश अंबेडकर यांनी पाठिंबा दिला. माझा पाठिंबा सांगलीत त्यांनी काढून घेतला आणि विशाल पाटलांना पाठिंबा दिला. दूसरीकडे बारामतीमध्ये सुप्रिया सुळे यांना पाठिंबा दिला. त्यामुळं प्रकाश आंबेडकर यांनी वंचित बहुजन आघाडी या नावात नेमकं कोण बसतं? हे त्यांनी स्पष्ट करावं असा टोलाही शेंडगेंनी लगावला.